ती वेडी रुसली आहे माझ्यावर
कारण मी कविता करत नाही तिच्यावर
कारण मी कविता करत नाही तिच्यावर
आता कसं सांगु तिला
तु किती आवडतेस मला
तु किती आवडतेस मला
तुझ्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही
म्हणूनच कधी कविता सुचली नाही
म्हणूनच कधी कविता सुचली नाही
पण आज हा प्रयत्न मी केला आहे
यातला प्रत्येक शब्द तुला दिला आहे
यातला प्रत्येक शब्द तुला दिला आहे
आता इथेच थांबायला हवं
अजूनकाही सुचत नाही
कधीकधी डोळ्यातही बघावं
प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही
अजूनकाही सुचत नाही
कधीकधी डोळ्यातही बघावं
प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही
- अमि
No comments:
Post a Comment