मी कवी नाही
Thursday, January 13, 2022
Friday, September 27, 2019
वेडी
ती वेडी रुसली आहे माझ्यावर
कारण मी कविता करत नाही तिच्यावर
कारण मी कविता करत नाही तिच्यावर
आता कसं सांगु तिला
तु किती आवडतेस मला
तु किती आवडतेस मला
तुझ्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही
म्हणूनच कधी कविता सुचली नाही
म्हणूनच कधी कविता सुचली नाही
पण आज हा प्रयत्न मी केला आहे
यातला प्रत्येक शब्द तुला दिला आहे
यातला प्रत्येक शब्द तुला दिला आहे
आता इथेच थांबायला हवं
अजूनकाही सुचत नाही
कधीकधी डोळ्यातही बघावं
प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही
अजूनकाही सुचत नाही
कधीकधी डोळ्यातही बघावं
प्रेम नेहमी शब्दात दिसत नाही
- अमि
ओळख
तु ओळखत नाही मला
पण मी पाहिलं होतं तुला
थोडा त्रास देतोय तुला
प्लिज समजून घेशील मला
नाव माझं अमि आहे
तुला आवडेल अशी हमी आहे
साडीत किती छान दिसतेस तु
अप्सरे सारखी मला भासतेस तु
तुझं सौंदर्य असंच खुलत रहावं
माझ्या सारख्यानी बघत रहावं
तुला नजर न लागो कुणाची
एवढीच इच्छा या वेड्या मनाची
- अमि 🚶
काळ
मी काळानुसार मोठा झालो
मी काळाकडून शिकत गेलो
चांगले वाईट दोन्ही काळ
आयुष्यात मी पाहत गेलो
चांगल्या काळाने माणसं दिली
वाईट काळाने ती दूर केली
या काळाला मी भांडणार नाही
तोही मला काही सोडणार नाही
जसं चालू होतं तसंच चालू राहील
या काळासोबतच एक दिवस
मी जग सोडून जाईल
मग तेव्हा मीही नसेल
आणि नसेल माझा काळ
आठवण जरी आली
तो असेल फक्त भूतकाळ
- अमि
आभाळ
अभाळाने आभाळाकडे बघणं
दोघांचंही सारखंच वागणं
एकाने पाऊस पाडून
निसर्ग फुलवला
दुसऱ्याने घाम गाळून
घरं फुलवलं
दोघांचेही आभार मानणे
मला कधी जमलंच नाही
मान वर करून सगळ्यांना
सांगता येईल
असं काही केलंच नाही
पण आता लवकरच करेल
यांच्यासाठी काही ना काही
मी आहे तोपर्यंत
दुष्काळ पडणार नाही
माझी ही कविता
साक्ष असेल माझी
फक्त वाचू नको माणसा
मला गरज लागेल तुझी
दोघांचंही सारखंच वागणं
एकाने पाऊस पाडून
निसर्ग फुलवला
दुसऱ्याने घाम गाळून
घरं फुलवलं
दोघांचेही आभार मानणे
मला कधी जमलंच नाही
मान वर करून सगळ्यांना
सांगता येईल
असं काही केलंच नाही
पण आता लवकरच करेल
यांच्यासाठी काही ना काही
मी आहे तोपर्यंत
दुष्काळ पडणार नाही
माझी ही कविता
साक्ष असेल माझी
फक्त वाचू नको माणसा
मला गरज लागेल तुझी
- अमि
Tuesday, February 12, 2019
शब्द आणि मी
आज शब्द म्हणाले मला
नेमकं काय झालंय तुला
मी बोलो
प्रेम झालंय मला
मग ते म्हणाले
अरे बोल मग तिला
आमची साथ आहे तुला
मी म्हणालो
बोलोय मी सगळं तिला
थोडी घाबरली आहे ती मला
कोण कुठला तू मुला
असं अचानक विचारतोय मला ?
असे प्रश्न पडले असतील तिला
तिची काळजी लागलीये मला
मग ते म्हणाले
कसा रे तू वेड्या मुला
काही समजतं नाही तुला
आधी समजून घे रे तिला
मग प्रेमाची व्याख्या कळेल तुला
मग मी म्हणालो
तुमचं सगळं पटलं मला
आधी समजून घेईल तिला
मग दाखवेल माझी कला
कारण प्रेम झालंय मला
- अमि 🚶🏻
नेमकं काय झालंय तुला
मी बोलो
प्रेम झालंय मला
मग ते म्हणाले
अरे बोल मग तिला
आमची साथ आहे तुला
मी म्हणालो
बोलोय मी सगळं तिला
थोडी घाबरली आहे ती मला
कोण कुठला तू मुला
असं अचानक विचारतोय मला ?
असे प्रश्न पडले असतील तिला
तिची काळजी लागलीये मला
मग ते म्हणाले
कसा रे तू वेड्या मुला
काही समजतं नाही तुला
आधी समजून घे रे तिला
मग प्रेमाची व्याख्या कळेल तुला
मग मी म्हणालो
तुमचं सगळं पटलं मला
आधी समजून घेईल तिला
मग दाखवेल माझी कला
कारण प्रेम झालंय मला
- अमि 🚶🏻
Wednesday, May 2, 2018
कोण आहे मी ?
काल सहज विचारलं तिने मला
कोण आहेस रे तु वेड्या मुला
सांग तुझ्या बद्दल सगळ काही
नाहीतर मी तुला बोलनारच नाहीं
तिचे असे ऐकुन घाबरलो ना मी
इकडे-तिकडे न बघता उच्चारलो ना मी
आरसा म्हणुन बघशील तर तुझ्या सारखा आहे मी
चव म्हणुन बघशील तर मीठा सारखा आहे मी
माणुस म्हणुन बघशील तर थोडा स्वार्थी आहे मी
जात म्हणुन बघशील तर भारतीय आहे मी
तहान म्हणुन बघशील तर अमृत आहे मी
सत्ता म्हणुन बघशील तर खोट आश्वासन आहे मी
प्रेम म्हणुन बघशील तर सिंगल आहे मी
जहिरात म्हणुन बघशील तर झिंगल आहे मी
विष म्हणुन बघशील तर पाप आहे मी
पुण्य म्हणुन बघशील तर आई-बाप आहे मी
ज्ञान म्हणुन बघशील तर विद्यार्थी आहे मी
कमळ म्हणुन बघशील तर लाभार्थी आहे मी
आनंद म्हणुन बघशील तर पार्टी आहे मी
दु:ख म्हणुन बघशील तर डर्टी आहे मी
जसा बदलतोय तुझा दृष्टिकोण तसा बदलत चालोय मी
प्रत्येक ओळी मध्ये तुला कदाचित हसवत चालोय मी
वेळ आलीये आता थांबण्याची चला रजा घेतोय मी
तुझ उत्तर तुला मिळालं अशी घोषणा करतोय मी
फुलपाखरू
कधी वाटतं फुलपाखरु बनावं
एखाद्या फुलाच्या प्रेमात पडावं
त्याच्या सुगंधाने मी हरवुन जावं
माझ्या येण्याने ते फुलुन जावं
रोज- रोज आमचं असचं घडावं
साक्षीदार म्हणुन पावसानं पडावं
मी अलगद त्याच्या मिठीत शिरावं
माझ्या स्पर्शाने त्याने भिजुन निघावं
या प्रेमगंधाने प्रत्येक बागेत शिरावं
प्रेमाचं प्रतिक म्हणुन संमदीकडे मिरावं
हे सुंदर स्वप्न कधीतरी खरचं घडावं
म्हणुन पुन्हा म्हणतोय कधी फुलपाखरु बनाव
सांभाळ
एक वेळ अशी आली
पिल्लु पडत होते खाली
तेव्हा आई जागी झाली
बाबाची झोप ही उडाली
आई - बाबाचा तो जीव
झाला होता कासावीस
थर - थर कापत होते
त्याचे इवलुसे पिस
आईने धरले त्याला चोचीत
सारखी राहीली वर खेचीत
बाबाने ही लावले पाठबळ
पिल्लु पाही त्यांची ती तळमळ
आई-बाबा चा तो सांभाळ
कधी नाहीं विसरु शकणार
जेव्हा जेव्हा आठवताल ते
तेव्हा तेव्हा डोळे रडणार
- अमि
मित्र प्रेमात पडलाय !
तुझ्या निमित्ताने का होईना
कवितेला विषय मिळालायं
सांगताना दु:ख होतयं मला
माझा मित्र प्रेमात पडलायं
आपल्या मैत्रीच्या कट्यावर
नेहमी मारतोयस तु दांडी
फिरवली आहे तुझ्यावर
कोणीतरी जादुची कांडी
साधा फोटो न टाकणारा तु
रोज प्रेमाचे स्टेटस टाकतोयस
नागिनीने डसलयं तुला लेका
कारण तु वेड्या सारखा वागतोयस
आजकाल कॅाल हिस्ट्री मध्ये
तुझ नावचं दिसत नाहीये
तुला तुझ प्रेम मिळालं म्हणुन
मी काही जळत नाहीये
मलाही प्रेमात पडायचं होत
उंच अकाशात उडायचं होत
पण अता भिती वाटते या प्रेमाची
ज्याने दुरावता माणसं जिवा भावाची
त्यामुळे हे असलं प्रेम करणं
मला तरी जमणार नाहीं
तु गेलास मला विसरुन
म्हणुन मी काही भांडणार नाहीं
कधी आठवण आलीच या भावाची
तर मागे पुढे पाहु नकोस
डायरेक्ट गळ्यात येवुन भेट
पण एकटा अश्रु वाहु नकोस
तुझ्या पारु लाही दाखव हि कविता
तिलाही कळुदे माझ्यातल्या वेदना
अता फक्त आठवणींचा बाजार उरलाय
कारण माझा काळु अता प्रेमात पडलाय
- अमि
Subscribe to:
Comments (Atom)
-
ती वेडी रुसली आहे माझ्यावर कारण मी कविता करत नाही तिच्यावर आता कसं सांगु तिला तु किती आवडतेस मला तुझ्यासाठी माझ्या...
-
तुझ्या निमित्ताने का होईना कवितेला विषय मिळालायं सांगताना दु:ख होतयं मला माझा मित्र प्रेमात पडलायं आपल्या मैत...





