Wednesday, May 2, 2018

सांभाळ




एक वेळ अशी आली
पिल्लु पडत होते खाली
तेव्हा आई जागी झाली
बाबाची झोप ही उडाली


आई - बाबाचा तो जीव
झाला होता कासावीस
थर - थर कापत होते
त्याचे इवलुसे पिस


आईने धरले त्याला चोचीत
सारखी राहीली वर खेचीत
बाबाने ही लावले पाठबळ 
पिल्लु पाही त्यांची ती तळमळ 


आई-बाबा चा तो सांभाळ
कधी नाहीं विसरु शकणार
जेव्हा जेव्हा आठवताल ते
तेव्हा तेव्हा डोळे रडणार 

                
- अमि


No comments:

Post a Comment

test