तुझ्या निमित्ताने का होईना
कवितेला विषय मिळालायं
सांगताना दु:ख होतयं मला
माझा मित्र प्रेमात पडलायं
आपल्या मैत्रीच्या कट्यावर
नेहमी मारतोयस तु दांडी
फिरवली आहे तुझ्यावर
कोणीतरी जादुची कांडी
साधा फोटो न टाकणारा तु
रोज प्रेमाचे स्टेटस टाकतोयस
नागिनीने डसलयं तुला लेका
कारण तु वेड्या सारखा वागतोयस
आजकाल कॅाल हिस्ट्री मध्ये
तुझ नावचं दिसत नाहीये
तुला तुझ प्रेम मिळालं म्हणुन
मी काही जळत नाहीये
मलाही प्रेमात पडायचं होत
उंच अकाशात उडायचं होत
पण अता भिती वाटते या प्रेमाची
ज्याने दुरावता माणसं जिवा भावाची
त्यामुळे हे असलं प्रेम करणं
मला तरी जमणार नाहीं
तु गेलास मला विसरुन
म्हणुन मी काही भांडणार नाहीं
कधी आठवण आलीच या भावाची
तर मागे पुढे पाहु नकोस
डायरेक्ट गळ्यात येवुन भेट
पण एकटा अश्रु वाहु नकोस
तुझ्या पारु लाही दाखव हि कविता
तिलाही कळुदे माझ्यातल्या वेदना
अता फक्त आठवणींचा बाजार उरलाय
कारण माझा काळु अता प्रेमात पडलाय
- अमि

No comments:
Post a Comment