अभाळाने आभाळाकडे बघणं
दोघांचंही सारखंच वागणं
एकाने पाऊस पाडून
निसर्ग फुलवला
दुसऱ्याने घाम गाळून
घरं फुलवलं
दोघांचेही आभार मानणे
मला कधी जमलंच नाही
मान वर करून सगळ्यांना
सांगता येईल
असं काही केलंच नाही
पण आता लवकरच करेल
यांच्यासाठी काही ना काही
मी आहे तोपर्यंत
दुष्काळ पडणार नाही
माझी ही कविता
साक्ष असेल माझी
फक्त वाचू नको माणसा
मला गरज लागेल तुझी
दोघांचंही सारखंच वागणं
एकाने पाऊस पाडून
निसर्ग फुलवला
दुसऱ्याने घाम गाळून
घरं फुलवलं
दोघांचेही आभार मानणे
मला कधी जमलंच नाही
मान वर करून सगळ्यांना
सांगता येईल
असं काही केलंच नाही
पण आता लवकरच करेल
यांच्यासाठी काही ना काही
मी आहे तोपर्यंत
दुष्काळ पडणार नाही
माझी ही कविता
साक्ष असेल माझी
फक्त वाचू नको माणसा
मला गरज लागेल तुझी
- अमि

No comments:
Post a Comment