Tuesday, February 12, 2019

शब्द आणि मी

आज शब्द म्हणाले मला
नेमकं काय झालंय तुला
मी बोलो
 प्रेम झालंय मला
मग ते म्हणाले
अरे बोल मग तिला
आमची साथ आहे तुला
मी म्हणालो
 बोलोय मी सगळं तिला
थोडी घाबरली आहे ती मला
कोण कुठला तू मुला
असं अचानक विचारतोय मला ?
असे प्रश्न पडले असतील तिला
तिची काळजी लागलीये मला
मग ते म्हणाले
कसा रे तू वेड्या मुला
काही समजतं नाही तुला
आधी समजून घे रे तिला
मग प्रेमाची व्याख्या कळेल तुला
मग मी म्हणालो
तुमचं सगळं पटलं  मला
आधी समजून घेईल तिला
मग दाखवेल माझी कला
कारण प्रेम झालंय मला

                - अमि 🚶🏻

No comments:

Post a Comment

test