Friday, September 27, 2019

काळ


               

मी काळानुसार मोठा झालो
मी काळाकडून शिकत गेलो
चांगले वाईट दोन्ही काळ
आयुष्यात मी पाहत गेलो
चांगल्या काळाने माणसं दिली
वाईट काळाने ती दूर केली
या काळाला मी भांडणार नाही
तोही मला काही सोडणार नाही
जसं चालू होतं तसंच चालू राहील
या काळासोबतच एक दिवस
मी जग सोडून जाईल
मग तेव्हा मीही नसेल
आणि नसेल माझा काळ
आठवण जरी आली
तो असेल फक्त भूतकाळ

              
 -  अमि

No comments:

Post a Comment

test