Wednesday, May 2, 2018

कोण आहे मी ?



काल सहज विचारलं तिने मला 
कोण आहेस रे तु वेड्या मुला 
सांग तुझ्या बद्दल सगळ काही
नाहीतर मी तुला बोलनारच नाहीं



तिचे असे ऐकुन घाबरलो ना मी 
इकडे-तिकडे न बघता उच्चारलो ना मी 
आरसा म्हणुन बघशील तर तुझ्या सारखा आहे मी
चव म्हणुन बघशील तर मीठा सारखा आहे मी



माणुस म्हणुन बघशील तर थोडा स्वार्थी आहे मी
जात म्हणुन बघशील तर भारतीय आहे मी
तहान म्हणुन बघशील तर अमृत आहे मी
सत्ता म्हणुन बघशील तर खोट आश्वासन आहे मी



प्रेम म्हणुन बघशील तर सिंगल आहे मी
जहिरात म्हणुन बघशील तर झिंगल आहे मी
विष म्हणुन बघशील तर पाप आहे मी
पुण्य म्हणुन बघशील तर आई-बाप आहे मी



ज्ञान म्हणुन बघशील तर विद्यार्थी आहे मी
कमळ म्हणुन बघशील तर लाभार्थी आहे मी
आनंद म्हणुन बघशील तर पार्टी आहे मी
दु:ख म्हणुन बघशील तर डर्टी आहे मी



जसा बदलतोय तुझा दृष्टिकोण तसा बदलत चालोय मी 
प्रत्येक ओळी मध्ये तुला कदाचित हसवत चालोय मी 
वेळ आलीये आता थांबण्याची चला रजा घेतोय मी
तुझ उत्तर तुला मिळालं अशी घोषणा करतोय मी



                                         
                                                                           - अमि

1 comment:

  1. मी खूप लकी आहे की मला तुझ्या मोडक्या तोडक्या अक्षरात वाचयला भेटली..

    मी नेहमी तुझ्या पोस्ट वाचायचो पण अलीकडे तू बऱ्यापैकी थांबलास..
    लिख ते रहो..
    तुझा प्रिय वाचक
    लिखाणासाठी हार्दिक सदिच्छा💐💐💐

    ReplyDelete

test